D.El.Ed. Examination JUNE, 2026
(Marathi Medium)
Time: 11.00 to 1.00 Hrs.
Date: 4/6/2026
(3 Pages) Max. Marks: 40
First Year (2016 Revised Syllabus) CURRICULUM, PEDAGOGY AND
EVALUATION
1.सूचनेनुसार पुढील प्रश्न सोडवा : (8)
(a) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून वाक्य पूर्ण लिहा:(4)
(1)……….. म्हणजे शिक्षणाची उद्दिष्टे साध्य करण्याचे साधन होय. (1)
(2)….….म्हणजे अनुभवामुळे व्यक्तीच्या माहितीत किंवा वर्तनात
होणारा कायमस्वरूपी बदल.(1)
(3) गॅग्नेने अध्ययन फलिताचे...........मुख्य क्षेत्रामध्ये
वर्गीकरण केले आहे. (1)
(4) मापनाला ज्यावेळी अर्थ लावला जातो त्यास............... असे
म्हणतात.
(1)
(b) चुकीची विधाने बरोबर करून लिहा : (4)
(1) अभ्यासक्रम हा पाठ्यक्रमाचा एक भाग आहे.(1)
(2) हिल्डा टावा यांनी उद्गामी विचाराच्या पाच कार्यनीती
सुचविल्या आहेत. (1)
(3) मूल्यमापन हे बौद्धिक कौशल्यातील सर्वात खालचे उद्दिष्ट
आहे. (1)
(4) ध्येयप्रेरित व
पूर्वनियोजित अध्यापन म्हणजे अध्ययन होय. (1)
2. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 60 ते 80 शब्दात लिहा:(8)
(1) 'ज्ञाताकडून अज्ञाताकडे' हे अध्यापन
सूत्र स्पष्ट करा.(2)
(2) अनुदेशनाची चार मूलभूत तत्त्वे लिहा.(2)
(3) वेब बेस्ड लर्निंगचे चार महत्त्वाचे
फायदे लिहा.(2)
(4) मूल्यमापनाचा त्रिकोण स्पष्ट करा.(2)
3. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 120 ते
160 शब्दात लिहा : (12)
(1) अभ्यासक्रमाचे विकसन करताना तुम्ही कोणत्या
टप्प्यांचा कसा उपयोग कराल ?(3)
(2) मापन व मूल्यमापन यामधील फरकाचे सहा मुद्दे
स्पष्ट करा. (3)
(3) कार्यनीती म्हणजे काय ? मनोचित्रण
कार्यनीती स्पष्ट करा. (3)
किंवा
संकल्पना
प्राप्ती प्रतिमान तुम्ही कसे स्पष्ट कराल ?
(4) डॉ. ब्लूम यांच्या बौद्धिक कौशल्याचे वर्गीकरण
सोदाहरण स्पष्ट करा. (3)
किंवा
अवधान
प्राप्तीसाठी चेतक योजना या घटनेचा उपयोग आपण वर्गअध्यापनासाठी
कसा कराल ?
4. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 200 ते 250 शब्दात लिहा: (12)
(1) पाठ्यक्रम म्हणजे काय ? पाठ्यक्रम
रचनेवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा.(4)
(2) 'संशोधन पद्धती' या कार्यनीतीचा
वापर अध्यापनात कसा कराल? (4)
(3) 'पडताळासूची' व प्रासंगिक
नोंदी या निरीक्षणतंत्राचा नमुना तयार करा. (4)
किंवा
त्रिमितिय संविधान तक्ता म्हणजे काय ?
संविधान तक्त्याचा आराखडा तयार
करा.
MAHARASHTRA D.E.ED QUESTION PAPER
D.EL.ED FIRST YEAR JUNE 2026 PEDAGOGY AND EVALUATION QUESION PAPER PDF
MARATHI MEDIUM D.E.ED. QUESTION PAPER DOWNLOAD
