HSC MARATHI
QUESTION PAPER 2026 FREE DOWNLOAD
एचएससी मराठी सन २०२६ प्रश्नपत्रिका मुफत डाउनलोड
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि
उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE), पुणे यांच्या मार्फत घेण्यात
येणाऱ्या इयत्ता १२ वी (एचएससी) मराठी विषयाच्या सन २०२६ च्या प्रश्नपत्रिकेची
प्रत विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी अपलोड करण्यात येत आहे. राज्य मंडळाच्या
अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात आलेली ही प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना परीक्षेच्या
दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षेचे स्वरूप, प्रश्नांची मांडणी, गुणांचे विभाजन, विविध घटकांवरील प्रश्नांचे प्रकार
तसेच वस्तुनिष्ठ, लघुउत्तर आणि दीर्घोत्तर प्रश्नांची रचना समजून घेता यावी, या उद्देशाने ही प्रश्नपत्रिका
उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षेपूर्वी
प्रश्नपत्रिकेचा सखोल अभ्यास करता येईल आणि योग्य नियोजन करून तयारी करता येईल.
तसेच, मराठी विषयातील आकलन, व्याकरण, गद्य-पद्य अभ्यास आणि लेखनकौशल्य
या सर्व घटकांचा समतोल अभ्यास कसा करावा, याबाबत विद्यार्थ्यांना स्पष्ट
दिशा मिळावी हा देखील या उपक्रमामागील महत्त्वाचा हेतू आहे. प्रश्नपत्रिकेचा
अभ्यास केल्यास विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल व परीक्षेत अधिक
चांगले गुण मिळविण्यासाठी प्रभावी तयारी करता येईल.
