Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना

 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना


About Scheme
Department Name

उच्च शिक्षण संचालनालय


Overview

सदर योजनेंतर्गत उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील शासकीय / अशासकीय अनुदानित / अंशत: अनुदानित (टप्पा अनुदान - विना अनुदान) / कायम विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये व अकृषी विद्यापीठे व त्या विद्यापीठा अंतर्गत असलेल्या उपकेंद्रामधील (खाजगी अभिमत विद्यापीठे / स्वयं अर्थसहाय्यीत खाजगी विद्यापीठे वगळून) व्यावसायीक व बिगर व्यावसायीक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या ज्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 8.00 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरीता शिष्यवृत्तीचा लाभ देय आहे.

Benefits
अ ) शिक्षण शुल्क :-

उत्पन्न मर्यादा

अभ्यासक्रम

शासकीय

अशासकीय अनुदानित

अंशत: अनुदानित (टप्पा अनुदानित -विना अनुदानित)

कायम विना अनुदानित

व्यावसायिक अभ्यासक्रम

रु. 2.50 लाख पर्यंत

100%

100%

50%

50%

रु. 2.50 लाख ते रु. 8 लाखापर्यंत पर्यंत

50%

50%

50%

50%

बिगर व्यावयायिक अभ्यासक्रम

रु. 8 लाखापर्यंत

100%

100%

100%

100%


ब ) परीक्षा शुल्क :-

व्यावसायिक अभ्यासक्रम

परीक्षा शुल्काच्या 50 टक्के

बिगरव्यावसायिक अभ्यासक्रम

परीक्षा शुल्काच्या 100 टक्के


Eligibility

(शासन निर्णय दिनांक 7 .१०. 201, 31 .३.2018 तसेच ०७.०८.२०१८ प्रमाणे, ११.०७.२०१९)
1.
अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. तथापि महाराष्ट्र - कर्नाटक राज्य सीमा भागातील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
2.
अर्जदाराच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
3.
शासन निर्णयानुसार प्रथम दोन मुले या योजनेसाठी पात्र आहेत.
4.
सामान्य श्रेणी आणि एसईबीसी श्रेणी अंतर्गत प्रवेश घेतला आहे अशा उमेदवार पात्र आहेत.
5.
शासन निर्णय दिनांक 07/10/17 (डीएचई अभ्यासक्रम) मधील अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.
6.
अर्जदाराने इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
7.
या योजनेचा लाभ दूरस्थ पध्दतीने (Open /Distance /Virtual Learning) अथवा अर्धवेळ (Part-Time) स्वरुपात चालविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार नाही.
8.
तसेच योजेनच्या लाभाकरीता अनुज्ञेय असलेला अभ्यासक्रम सुरु करण्यास शासनाची व संबंधित सक्षम संस्थाची (AICTE/PCI/COA/MCI/NCTE, विद्यापीठ / शिक्षण मंडळ, इ.) पूर्व मान्यता व संलग्नता असणे आवश्यक आहे.
9.
अर्जदार विद्यार्थ्यास प्रत्येक सत्र अथवा वर्षाची परीक्षा देणे आवश्यक राहिल.


Renewal Policy

1.मागील वर्षी सदर शिष्यवृत्ती चा लाभ घेतलेले विद्यार्थी शिष्यवृत्ती च्या नूतनीकरणासाठी अर्ज करू शकतात.
2.
नूतनीकरनासाठी विद्यार्थाने उच्च शिक्षण संचालनालयाच्या www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमधील Application ID चा उपयोग करावा.


Documents Required

1.सक्षम प्राधिकरणाने दिलेले अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
2.
शैक्षणिक वर्षाच्या लगतपूर्वीच्या वित्तीय वर्षाचे संबंधित तहसिलदार अथवा सक्षम अधिकाऱ्याने दिलेले उत्पन्नाचे प्रमापणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
3. CAP
संबंधित कागदपत्रे. (केवळ विधी, शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षण शास्त्र अभ्यासक्रम )
4.
गॅप संबंधित दस्तऐवज (गॅप असल्यास)
5.
दोन मुलांचे कुटुंब घोषणापत्र. 

 

Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Shikshan Shulkh Shishyavrutti Scheme

Post a Comment

0 Comments